स्पर्धक, निंदक आणि देहबोली
स्पर्धक की निंदक? दोनपैकी सगळ्यात जास्त ताकद कुणात असेल? वाचूयात?..........आज तुमच्या भेटीला बरेच दिवसांनी पण एका ताज्या आणि वेगळ्या विषयावर बोलायला आले आहे. मित्रांनो/ मैत्रिणींनो आपल्याला कायमचं निंदकांचा राग येतो नं......पण ते अत्यंत महत्त्वाचे असतात. सोबतच इतरांच्या देहबोलीतून आपल्यावर होणारा प्रभाव ही तितकाच महत्त्वाचा..
स्पर्धक , निंदकआणि देहबोली
किती गंमत आहे नं या शब्दांची. तसं बघायला गेलं तर सारखे च भासणारे हे दोन शब्द पण यांचा प्रभाव मात्र अगदी परस्परविरोधी असा असतो. म्हणजे बघा 'निंदक' हा शब्द कानाला आणि मनाला ही कितीही नकारात्मक वाटत असला तरी आयुष्यात आपल्याला खूप उंचीवर नेऊन ठेऊ शकतो. "निंदकाचे घर असावे शेजारी" असे उगीच का म्हटले आहे?
अहो स्पर्धका चा जितका विचार केल्या जात नाही त्याच्या दुप्पट विचार निंदकाचा केला जातो. निंदकामुळे नकारात्मक का होईना पण पुढे जाण्याची प्रेरणा नक्कीच मिळते.
आयुष्यात स्वतः च्या प्रगती साठी स्वतः सोबत च स्पर्धा असावी असं म्हणतात. बाहेर ही अनेक स्पर्धक असतात च . स्पर्धकामुळे आपल्याला complex येतो पण निंदका मुळे confidence दुणावतो.
त्यामुळे अलबत आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू करतो.
तितकीच ताकत माणसाच्या देहबोलीत असते. " Actions speak louder than words" असं म्हणतात आणि ते अगदी सत्य आहे. स्पर्धकाची देहबोली ही प्रेरणा देणारी असते. पण निंदकाची देहबोली? तुम्ही म्हणाल की आता च तर म्हणत होतात की निंदकामुळे आपण पुढे जातो. पण निंदकाची देहबोली पुढे नेईल च असे नाही. कारण देहबोलीतून शब्दांपेक्षा जास्त ताकदीने ऊर्जा उत्सर्जित होते आणि त्याचा प्रभाव ही बराच वेळ टिकणारा असतो. नकारात्मक देहबोलीतून अर्थातच नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते.
तर अशा या सगळ्या शब्दांच्या गमती जमती. म्हणून च एकवेळ स्पर्धक नसला तरी चालेल पण निंदक जरुर असावा. आणि निंदक असला तरी चालेल पण त्याची देहबोली सकारात्मक असायला हवी.......तरच आपण आहोत त्या ही पेक्षा उंच ठिकाणी असू😊
पुन्हा भेटू नवीन विषयावर मंथन करायला 😀
©️ प्राजक्ता शैलेश ठोंबरे
२९/०९/२१
नागपूर
#निंदक#
#स्पर्धक#
#देहबोली#
खूप सुंदर
ReplyDeleteManapasun dhanyavad 🙏
Deleteखूप छान
ReplyDeleteManapasun dhanyavad 🙏
DeleteSunder...
ReplyDeleteThank you jijaji
Deleteखूप छान...
ReplyDelete