( कविता) संकोच का बाळगावा

 हल्लीच्या काळात मनमोकळेपणाने संवाद साधला जात नाही परीणामी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. कधी वेळेचा तुटवडा तर कधी अहंकारामुळे नाते संपुष्टात येते.  माझी ही कविता त्या प्रत्येक नात्या साठी

कविता 'ऑक्सिजन' वर असलेल्या नात्यांवर......'संकोच का बाळगावा' पण सोबतच नाती जपतांना एक 'माणूस' म्हणून कसं जगावं हे ही तितकंच महत्त्वाचं.....हे सांगणारी कविता 


संकोच का बाळगावा


मनातलं ओठांवर आणतांना

मुक्तपणे हसतांना 

संकोच का बाळगावा?


कुणासाठी झुरतांना 

डोळ्यातील टिपे गाळतांना 

संकोच का बाळगावा?


मनातलं वादळ शमवतांना

 आधार कुणाचा घेतांना 

संकोच का बाळगावा? 


हक्काच्या माणसावर रुसतांना

भरपूर रागे भरतांना 

संकोच का बाळगावा?


 संवादातून नाती जपतांना

ती टिकवण्यासाठी धडपडताना

संकोच का बाळगावा?


अहंकाराच्या शेकोटीत

गैरसमजाचा वणवा पेटतांना

'मी' पणाची आहूती देतांना 

संकोच का बाळगावा?


जीवनाचा प्रवास करताना 

नात्यांना आॅक्सिजन देतांना 

संकोच का बाळगावा?


घेताना कणभर पण देतांना मणभर

आनंदाची लयलूट करतांना

 संकोच का बाळगावा?


भरभरून कौतुक करतांना

ज्याचे श्रेय त्यास देतांना

संकोच का बाळगावा?


कुणाची मदत करताना

नि:स्वार्थी भाव जपतांना

संकोच का बाळगावा?


विधात्याने दिलेलं आयुष्य

त्याच्याचसाठी वाहतांना

संकोच का बाळगावा?


शेवट चा प्रवास करतांना

मोहातुन स्वतः ला सोडवतांना

संकोच का बाळगावा?




©️ प्राजक्ता ठोंबरे

दिनांक: १७/०२/२१

नागपूर





Comments

  1. प्राजक्ता ताईंच्या ह्या छान कवितेचे कौतुक करताना,
    काव्य मनापासून आवडले असताना,
    मी संकोच का बाळगावा ?

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद मधुरा ताई. प्रतिसाद द्यायला उशीर झालाय. त्याबद्दल क्षमस्व

      Delete
  2. Waw!मस्त निःसंकोचपणे लिहिलेली कविता👌👍

    ReplyDelete
  3. खर आहे ...संकोच का बाळगावा ..छान कविता

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुरेखा ताई

      Delete
  4. खर आहे ...संकोच का बाळगावा ..छान कविता

    ReplyDelete
  5. मनमोकळी दाद द्यायला संकोच कां बाळगावा!,,,सुंदर

    ReplyDelete
  6. उत्कृष्ठ काव्याची वाहवाही करतांना
    .... आम्ही संकोच का बाळगावा?!
    वाह वाह !!

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद दादा

      Delete
  7. Replies
    1. मनापासून धन्यवाद ताई

      Delete

Post a Comment