एकांत

 मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार. मधल्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे व्यस्त दिनचर्या होती . त्यामुळे लिखाण लांबले....बद्दल क्षमस्व. 

आज एक हळवा विषय घेऊन आपल्या भेटीला आले आहे.... प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा...


                              एकांत


खरंतर 'एकांत' सगळयांना हवा हवासा च वाटतो. हल्ली च्या  धावपळीच्या जीवनशैलीत तर हवाच . त्यात नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना तर विचारुच नका......😃
हल्ली या एकांताला च 'स्पेस' असं म्हणायला लागले आहेत लोक.
शब्द काही असला तरी महत्त्व सारखंच. 

एकांत असला की काही लोकांना छान सुचतं, कांहींना फार गोंगाट आवडत नाही म्हणून एकांत हवा असतो, विद्यार्थी वर्गाला अभ्यासा साठी हवा असतो. नव्याने लग्न झालेल्या नवरीला नवर्या सोबत हितगुज करता यावं म्हणून एकांत हवा असतो...... कारणं
वेगवेगळी असली तरी वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तो हवा असतो हे खरंय. अगदी मुला - मुलींचं लग्न कार्य उरकून एक जबाबदारी पूर्ण करुन पुन्हा नव्याने आजी -आजोबांच्या नव्या भूमिकांमध्ये अडकायच्या आत सुद्धा हा एकांत हवा असतो.

खरंतर जबाबदार्या आणि कर्तव्ये पार पाडताना एकांत कुठल्या कुठे हरवलेला असतो. आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा तो गवसतो तेव्हा पुन्हा एकदा घर बोबड्या बोलांनी निनादून उठतं.

वर्ष सरत जातात तसे शरीर अधिक च थकायला लागते. आतापर्यंत एकांतासाठी धडपडणारे मन आता मात्र 'एकांता' ला घाबरायला लागते. बरेचदा जोडीदार सोबत असून ही आता एकमेकांशी बोलता येत नसतं. 
तरुण मंडळी आपापल्या व्यापात असतात, आपलं असणं आता पूर्वीसारखे महत्त्वाचे नाही का? असे विचार मनात यायला लागतात.भरलेल्या घरात आणि नको असलेल्या (म्हातारपण) वयात च एकांत मिळतो ही म्हातार पणातली सर्वात मोठी खंत आहे.

म्हणून च एकांत हवा म्हणण्यापेक्षा प्रत्येक क्षण जगून घ्यावा.
म्हातारपणात एकांत कोणाच्याही वाट्याला  न येवो हेच खरे सुख.

मित्रांनो आता इथेच विराम घेते.....लवकरच परत येईन तुमचा एकांत घालवण्यासाठी...... तूर्तास निरोप घेते.
 ©️ प्राजक्ता ठोंबरे
नागपूर
#एकांत#
#lonliness#
#एकटा##एकटेपणा#

Comments

  1. खरंच वेगळा विषय घेतलास ... छान लिहलंय !!

    ReplyDelete
  2. Replies
    1. धन्यवाद उज्वला ताई

      Delete
  3. Khup chan ahe ani blog cha look pan surek ahe

    ReplyDelete

Post a Comment