लग्न जुनं व्हायला लागले की.....( कविता)
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज मी अतिशय खमंग ,आंबट ,गोड आपल्या सगळ्यांच्या आवडीचा.......... पदार्थ नाही हो, विषय माझ्या कवितेत मांडला आहे. नवरा -बायको चं नातं कसं वर्षागणिक मुरत जातं नाही? पण ह्या सगळ्यात कधी तरी आपण आपल्या जोडीदाराला गृहित धरायला लागतो.... त्या वेळेस होणारी घालमेल प्रत्येक जोडप्याला अनुभवावी च लागते. ह्या गोड नात्यासाठी ही माझी आजची कविता. बरेच काही राहिले ही असेल पण कशी वाटली नक्की सांगा.....
लग्न जुनं व्हायला लागले की........(कविता)
लग्न जुनं व्हायला लागले
की असंच होत असते
कधी काळचे प्रियकर प्रेयसी
लुप्त होऊन जातात
घरातल्या जबाबदार्या मुलांची बालपण
सारे काही करताना हरवतात
पूर्वी सारखा एकमेकांचा वेळही नाही मिळत
गप्पा तर सोडाच हल्ली साधा संवाद ही नाही साधत
निमूटपणे सगळे काही पार पडत असते
शब्दांशिवायच आता एकमेकांचे सगळे कळत असते
लग्न जुनं व्हायला लागलं की
दोघे असेच वागतात
न कळत च एकमेकांना गृहित
धरायला लागतात
हा प्रेमाचा शेवट समजावा ,
की नवी सुरुवात?
आप -आपल्या क्षेत्रात करायची
असते संकटांवर मात
हळूहळू सगळ्याची सवय व्हायला लागते
एकमेकांच्या वागण्याची तर्हा
कळायला लागते
नवरा -बायको च्या भूमिकेत आता
ते पुरते शिरलेले असतात
न बोलताच एकमेकांना बरंच
जाणून असतात
प्रियकर -प्रेयसी चा संपतो इथं उथळपणा
करायचा असतो संसार , हवा
समंजसपणा
लग्न जुनं व्हायला लागलं की
असंच व्हायला लागतं
जबाबदार्या सांभाळताना
तरुणपण पणाला लागतं
सुटलं नाही कुणीच या
रहाटगाडग्यातून
सगळंच काही ठेवलंय ना
विधात्याने लिहून
निष्काम कर्म आपण यालाच म्हणायला हवं
लग्न जुनं होतांना हेच
समजून घ्यावं
©️प्राजक्ता ठोंबरे
९/०६/२०
Khup chan
ReplyDeleteधन्यवाद
DeleteNice lines written prajakta, really it happens like this only... In our life.... 👍 👍
ReplyDeleteThank you 😊
Deleteखूप छान 👌👌👌 कशी लिहतेस,
ReplyDeleteकसे सुचते, कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
अरे वाह, खूप छान लिहिलं आहे
ReplyDeleteवा, अगदी पटलं!
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteछान आहे कविता 👌
ReplyDeleteKhupp....chan.....lihtes
ReplyDelete