Skip to main content
कोरोना शिक्षा नव्हे शिकवणूक
कोरोना शिक्षा नव्हे शिकवण
"अगं परी तुला किती वेळा सांगायचं की बाहेरून आल्याबरोबर स्वयंपाकघरात यायचं नाही ते...
आधी पायावर पाणी घ्यावं ,हात स्वच्छ धुवावेत मग च खाण्याच्या पदार्थाला हात लावत जा"...परी च्या आई ने परी ला रागवत म्हटले.....परी म्हणाली... "अगं आई ,मी फक्त हात,पाय च नाही धुतले तर नखशिखांत शुद्ध होऊन आली आहे.....तेव्हा हे माते माझ्या उदरातील यज्ञाला शांत कर माते ,शांत कर🙏🙏"....परीला हात जोडून असे बोलताना पाहून आईला हसूच आले.....तशी आई म्हणाली ...'काय गं नखशिखांत शुद्ध म्हणजे नेमकं काय केलेस तू?'
परी:- "मी आल्याबरोबर अंघोळ केली.....आता दे गं आई खायला काहीतरी पट्कन..... खूप भूक लागली आहे गं मला....."
माय लेकींमधला हा प्रेमळ संवाद तुम्हाला नक्कीच आवडला असेल नं.....पण मैत्रिणींनो...हल्ली हे प्रेम घराघरात अगदी प्रत्येक नात्यात दिसायला आणि अनुभवायला मिळतय.... पूर्वी ज्या घरातील चार लोकांची तोंडं चार दिशेला असायची.....तीच चार तोंडं हल्ली हितगुज करत आहेत.... मोबाईल वर फिरणारे हात हल्ली धूळ पुसण्यासाठी किंवा घरातील कामात हातभार लावण्यासाठी सरसावतांना दिसतात.....आपण सगळेच स्वच्छतेच्या बाबतीत खूप सजग आणि सतर्क झालो आहोत.माणसा पासून दुरावलेला माणूस आता मनाने जोडल्या जातोय. मला वाटतं काही काळ बाहेर जाता येत नाहीये....पण घरात राहून घरातल्यांना वेळ देऊन घराचं घरपण अनुभवणं ह्यात काही वेगळी मजा आहे.
पैशासाठी जिवाचं रान करणारा तुमचा जीव आता ...जिने तुमच्या घराला जिवंतपणा दिला तिच्या साठी तुटत असेल. जगण्यातील सहजता हरवली आहे पण नात्यांमधील जवळीक वाढली आहे.
मित्रांनो/मैत्रिणींनो, निसर्ग तर आपला वेळ घेत च आहे...... त्याला आपण कधीच काही दिले नाही....तो मात्र कायम देतच आला.....आता आपली पाळी निसर्गाला मोकळा श्वास घेऊ देण्याची,टाळेबंदी चे सर्व नियम पाळायची. पुन्हा नव्याने सुरुवात करूया.....कोरोना ला शिक्षा नव्हे शिकवणूक म्हणूया.....🙏
©️ प्राजक्ता ठोंबरे
Comments
Post a Comment