माझी शाळा ऑनलाईन शाळा ( कविता)

'माझी शाळा ऑनलाईन शाळा '  






कोरोना आला कोरोना आला
चहूकडे याचा बोलबाला झाला 



 अमेरिका,इराण,वुहान, इटली
सगळ्यांची शिकवणी कोरोनानी घेतली 


पाहता पाहता सगळे, झाले घरात बंद
सुरु झाले जोपासणे, नव्याने जुने छंद 


आम्हा मुलांची तर झाली चांगलीच चंगळ
परीक्षा च नाही म्हटल्यावर खूप घातला गोंधळ 



आई बाबांना मिळतच नव्हता आमच्यासाठी इतका वेळ
आता मात्र रोज रंगतो पत्ते,कॅरम, क्रिकेट चा खेळ 



३ महीने घरात राहून सगळयांना च आला कंटाळा
मास्क लावून ,नियम पाळू आता कराना सुरू शाळा 



पूर्वी मोबाईल नेला की बदडायचे मास्तर
आता म्हणतात अभ्यास कर पण घरीच ठेव दप्तर 



शाळा होणार नाहीत सुरू ,म्हणे करा ऑनलाईन लरनिंग
आम्हा मुलांना जमेल का  हो असे नाॅलेज अरनिंग ? 



बघता बघता सुरू झाली आमची ऑनलाईन शाळा
पहिल्या दिवशीच  वाटलं जणू  झाली  शाळेची अवकळा 


हळूहळू कळायला लागलं ऑनलाईन शिक्षण
शिक्षक ही शिकवायचे देऊन पाॅवर पाॅईंट प्रेझेंटेशन 



इतक्या कमी वेळ शाळेचा कधीच पाहिला नव्हता
ऑनलाईन अभ्यासाचा मात्र घाट च वेगळा होता 



नाईलाजाने का होईना आईने मोबाईल दिला होता
कामात असली तरी तिचा वाॅच राहणारच होता 




वर्गात ल्या सारखीच ऑनलाईन मधेही मज्जा यायला लागली
अधूनमधून मोबाईल ची रेंजच जायला लागली 



कधी कधी तर ५ नंतर  १२ वाच नंबर येई
मधले नंबर शोधताना मग तारांबळ च होई 



काहीही असलं तरी मेहनत घेत आहेत शिक्षक
ऑनलाईन सुटलं काही तर व्हाॅट्सएप थृ मार्गदर्शक 



कोरोना जाईपर्यंत असणार ऑनलाईन आमची शाळा
घरात रहा , सुरक्षित रहा,सोशल डिस्टंसिंग पाळा 



आम्ही मुलं शिकतोय आता दिसत नसला जरी फळा
ऑनलाईन लरनिंग चा लागलाय आता आम्हाला लळा 



माझी शाळा ऑनलाईन शाळा.....
वाटतो  आम्हास तिचा  जिव्हाळा .....


© प्राजक्ता ठोंबरे

















Comments

Post a Comment