बाबा (अल्लड मुलापासून 'बाबा'पर्यंतचा प्रवास)



या कवितेत मी पितृदिनानिमित्य  
अल्लड मुलापासून 'बाबा' पर्यंतचा प्रवास लिहीला आहे. अजूनही बरेच पैलू मांडायचे राहिलेत ते पुढच्या भागात लिहिणार..





                    " बाबा "

           




अवखळ अल्लड मुलगा
तरुण होतो जेव्हा
लग्नासाठी घरचे सगळे
गळ घालतात तेव्हा 





मुलाच्या भूमिकेतून अवचित 
आता पती व्हायचे असते
आई आणि बायको मधील 
दुवा व्हायचे असते
स्वत:च्या आई-वडीलांसोबतच
आता बायको चे ही गणगोत असते 





बेफिकीर मुलाचा आपसूकच
आता जबाबदार पती होतो
पाहता पाहता तोच आता
घराचा कर्तापुरुष होतो 





आदर्श मुलगा, जबाबदार पती
कर्तृत्ववान जावई
कौतुक करताना दुनिया म्हणते
"बाप से बेटा सवाई" 





अवचित एखाद्या क्षणी मग 
बाप होण्याची चाहूल लागते
आनंदाने गगनही मग 
ठेंगणे त्याला भासू लागते 





पतीच्या भूमिकेतून आता 
बापाच्या भूमिकेत शिरायचे असते
बाप म्हणून नव्याने
जगासमोर यायचे असते 





*मुलीचा* बाबा होतो जेव्हा 
अचानक हळवा होतो तेव्हा
*मुलाचा* बाबा होतो जेव्हा 
स्वत: चे बालपण शोधतो तेव्हा 






मुलांचे हट्ट पुरविण्यासाठी
कष्ट घेतो अपरंपार
कारण आता असतो तो
एक बाप जबाबदार 






कधीकाळी शीघ्रकोपी असणारा पती
असतो आता संयमी शांत
कारण पदरी असते संतती
त्यांच्या भविष्याची असते भ्रांत 



सगळ्यात जास्त कस लागतो
जेव्हा होतो तो बाबा
सोपा नसतो हो त्याच्या ही साठी
भावनांवरचा ताबा  



अल्लड मुलापासून 'बाबा'पर्यंतचा प्रवास
बाप म्हणून सगळे त्याला गृहित धरतात सर्रास
सोपा नसतो त्याच्याही साठी भूमिकांमधला बदल
तरीही मात्र बाबाच्या भूमिकेत तो होतो सफल
सर्व घरातील 'वडीलांना' समर्पित🙏 


©️प्राजक्ता ठोंबरे
दिनांक: २२/०६/२०२०
नागपूर.

Comments

Post a Comment