Skip to main content
निःशब्द
*नि:शब्द*
©️ प्राजक्ता ठोंबरे
मैत्रिणींनो/ मित्रांनो......तुम्ही मला सांगू शकता का,की कुठलीही व्यक्ती नि:शब्द केव्हा होते?.... एखादी विस्मयचकीत गोष्ट घडल्यावर? की आत्यंतिक आनंद देणा-या क्षणी? अनपेक्षित पण सुखद धक्का मिळाल्यावर? की अत्यंत दु:खामुळे व्यक्त होता येत नाही तेव्हा? की .....आपण परिस्थिती समोर हतबल असतो तेव्हा? सांगा ना केव्हा?.... 'माणूस' नि:शब्द केव्हा होतो?
आज मी हा विषय हाताळते आहे कारण आज मी पुन्हा नि:शब्द झाले. हो .... . *पून्हा*........ काय विचार करताय? माझ्या नि:शब्द असण्याचं कारण काय असेल याचा? ........कारण उद्विग्नता, अन्यायाने पेटून उठलेलं मन, भावनांचा नुसता हलकल्लोळ माजला आहे मनात, प्रचंड 🔥 आगीचा लोळ....
एकदा मनातून बाहेर काढून त्या माणुसकी ला काळीमा फासणारया त्या विकृत समूहाला होरपळून काढायला आतूर झालेलं *माझं* *मन* कारणीभूत आहे माझ्या नि:शब्दतेचं.
निर्भया प्रकरण, मध्यंतरी घडलेली हिंगणघाट (समुद्रपूर) येथील महीला विद्यालयातील अध्यापिकेवरील अॅसिड अटॅक, एकीकडे गायीला गौमाता म्हणत हिंदू संस्कृती चे दाखले देणारे पण आम्हीच....आणि पैशासाठी त्याच गौमातेला कत्तलखान्यात पाठवून त्या गौमातेचं मांस टराटरा फाडून तिचे लक्तरं करणारेही आम्हीच😭.........
गाय च नव्हे म्हशीची पण तीच अवस्था, बैलांची ही तीच अवस्था.....हरीण.....,... पूर्वी या यादीत वाघ पण होता....त्या हिंस्त्र पशूच्याही वरताण होऊन माणसाने त्याच्याही कातडीचा व्यापार मांडला होता...
पण त्याच्या सुदैवाने *'save* *tiger*'हा प्रोजेक्ट आला आणि ह्या प्राण्याचे हाल व्हायचे थांबले
किती आणि कोणकोणत्या प्राण्यांचा उल्लेख करावा? .........त्यात आता परवा घडलेल्या घृणास्पद प्रकारामुळे हत्तीणीचा ही या यादीत समावेश झाला.
माणसांमध्ये हल्ली माणूसकी पेक्षा विकृतीचंच दर्शन घडायला लागलंय.वर उल्लेख केलेल्या सगळयाच घटना माणसातल्या विकृतीचं ज्वलंत (एकापेक्षा एक) उदाहरणं आहेत......प्रत्येक च घटना घडून गेल्यावर मनावर असंख्य आघात झालेत. आणि या परवा घडलेल्या घटनेनी तर मन छिन्न विछिन्न झालंय....
"पुत्राचे सहस्त्र अपराध l माता काय यांनी त्यांचा खेद "l ... ...... हे असं वर्णन आहे आपल्या धार्मिक पुस्तकांमध्ये ( श्री व्यंकटेश स्तोत्रात) *आई* चं .आणि वास्तविकतेत 'आई' खरोखरच अशीच असते. या वर्णनाला ना आपली वसुंधरा ( पृथ्वी माता) अपवाद आहे ना प्राण्यांमधील कुठल्याही प्रजातीची आई..........
केरळ मधील ज्या विकृत माणसांनी त्या हत्तीणीला पेटवलेले फटाके भरुन अननस खायला दिले.....त्या विकृत माणसांसहित ही त्या हत्तीणीला जलसमाधी घेता आली असती......पण तिने तसे केले नाही कारण ती एक आई होती..... तिच्या ठिकाणी असलेल्या मातृत्वाने ह्या अशा विकृतांचे ही अपराध पोटात घेतले....स्वतःच्या बाळाला ती वाचवू शकली नाही पण त्या विकृतवीरांना तिने कुठलाच त्रास दिला नाही. कुणाला जीवदान देता येत नसेल तर कुणाचा जीव घेऊ ही नये ह्या न्यायाला ती जागली. पण माणसाचे काय?
माणसाने तर जणू काही नीचतेचा उच्चांक च गाठायचा असा काही नेम केलाय. हत्या ती हत्या च असते ती अशा विकृती ने केलेली असो किंवा जीभेचे चोचले पुरविण्यासाठी केलेली असो.......आपल्या इतकाच प्रत्येक जीव इथे जीवन जगायला आलायं....त्याचाही त्याच्या अस्तित्वावर अधिकार आहेच.
त्या विधात्याने सृष्टी घडवताना माणूस आणि प्राणीमात्रांना परस्परपूरक बनवलं आहे हे आपण सर्रास विसरतो.....
माणसाने प्रत्येक वेळेस माणूसकीला, संवेदनांना सुरूंग लावावा आणि निसर्गाने मात्र कायम च सहन करावे असे का? .....का ? निसर्ग आणि तो विश्वनियंता इतका उदार का? का नाही देत तो आपल्या कुकर्मांची शिक्षा तात्काळ?
एकीकडे डाॅ. प्रकाश आमटे कुटूंब ज्यांनी कितीतरी प्राण्यांना दत्तक घेऊन आई -वडीलांसारखे प्रेम केले आणि दुसरीकडे त्या हत्तीणीला विनाकारण त्रास देणारे विकृत माणसं हे दोन घटक एकाच पृथ्वी वर ? एकाच नाण्याच्या दोन ईतक्या भिन्न बाजू असू शकतात?....... नि:शब्द झालात नं?
या प्रसंगी खरंतर लिहायला लेखणी धजावत नव्हती..... लिहिताना कित्येकदा अक्षरं दिसेनाशी होत होती.....पण या निसर्गाला, त्या विधात्याला आक्रोश करून सांगावेसे वाटते की,' हे निसर्गा ,आम्ही तुझ्या क्षमेस पात्र नाही.....तेव्हा आमच्या कुकर्मांचा काय निकाल लावायचा तो त्वरेने लाव. कारण अजून काय आणि किती बघायचे राहिले आहे?.......
मित्रांनो/मैत्रिणींनो आज मुलांना पाॅश आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्यापेक्षा निसर्गाच्या शाळेत दाखला देऊन भूतदया आणि संवेदनशीलतेचे धडे देण्याची जास्त गरज आहे असे वाटते.....तेव्हा मी माझ्या लेखणीच्या माध्यमातून विनंती करते की आपाआपल्या पातळीवर संवेदनशीलता आणि भूतदयेचे धडे प्रत्येक आई-वडिलांनी घराघरांतून करावे.
ही पोस्ट नावासहीत शेयर करायला हरकत नाही.
*दिनांक*
*५/६/२०२०*
सुंदर लेख, वाचून छान वाटलं
ReplyDeleteDhanyavad
ReplyDeleteआजच्या समाजाची मानसिकता दर्शवणारा लेख .... ही अतिशय गंभीर समस्या होत चालली आहे.
ReplyDeleteKhare ahe.
DeleteDhanyavad...
Delete