रंग जीवनाचे
रंग जीवनाचे
नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो मी रंग जीवनाचे या नावाने आज bloggers.com वर पहिल्यांदाच लिखाण करते आहे. माझ्या ब्लाॅग वर तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर लिखाण वाचायला मिळेल. वाचा आणि कसं वाटलं नक्की कळवा.
रंगांमुळेच तर जीवन जगण्याची मजा आहे.त्या ईश्वराची कलाकृती जिला आपण निसर्ग म्हणतो, तो निसर्ग च दररोज कितीतरी रंगांची उधळण करीत असतो.निसर्गातील हिरवा रंग मनाला गारवा देतो. तेज:पुंज सूर्याचा प्रकाश आळस झटकून नित्य नवीन ऊर्जा प्रदान करतो.
रात्र आणि दिवस तसंच ऋतूंमधे होणारे बदल हेच सुचवतात की कुठलीच गोष्ट शाश्वत नाही......मग मनुष्याच्या जीवनातले रंग ही हा परिवर्तनाचा नियम पाळल्याशिवाय कसे राहतील? म्हणूनच सुखाचा , आनंदाचा काळ मनाला भावणारया रंगांत भिजवतो, आणि पावसानंतर वातावरणात उमस जाणवावी तशीच उमस ( रुखरुख) जाता जाता देऊन जातो.
माणसाला फक्त सुखच हवेहवेसे वाटते......पण दू:खाचा ही काळा रंग साजिरा च असतो . गडद काळा का असेना कित्ती काय शिकवून जातो......
संघर्ष , मेहनत, आपल्या लोकांत परके ओळखण्याची दृष्टी, आणि संयम त्याच्यामुळे च शक्य होते.माथ्यावरचा सूर्य जसा तळपतो जणू काही तो हेच सांगतो की , ' हे मानवा ऊठ, आणि मनावरील मळभ दूर कर आणि झोकून दे स्वतःला कर्तृत्वाच्या यज्ञात आणि तू पण उजळून निघ, सिद्ध कर कर्तव्यपुर्तता.
द्वेषाचा रंग जेव्हा नात्यांना खराब करतो, तेव्हा प्रेमाचा गुलाबी रंग नाती सांभाळून घेतो.
रागाचा लाल रंग ही सुंदरच ...... कारण या रंगाचे महत्त्व जेवणातल्या मिठासारखे आहे..... नात्यांमध्ये हा रंग चाखल्याशिवाय प्रेमाचा गुलाबी रंग कसा चाखता येईल? कारण रागाने लाल झालेल्या व्यक्तीला गुलाबी रंगाचं प्रेमळ कवच नक्कीच असते.....
तर असे हे निसर्गातले आणि मानव जीवनातले रंग आपलं जीवन सर्वार्थाने सुंदर बनवतात. म्हटलं तर हे रंग आहेत ही आणि नाहीत ही..........मानव मनाने कल्पना करून प्रत्येक भावनेला एक एक रंग देऊ केलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही..... तरी ही.... रंग सुंदर च...!... आणि म्हणून च जीवनात या विविध रंगांचा आस्वाद घेत शेवटी आध्यात्मिकतेचा रंग परीधान करून त्या तेज:पुंजात विलीन व्हायचे...... आणि मग पून्हा एकदा अनुभवायचे रंग जीवनाचे......
Copyright
प्राजक्ता ठोंबरे
१४/०६/२०
नागपूर



Khup mast lekh 😘
ReplyDeleteSuper
ReplyDeleteMastach...... good
ReplyDeleteDhanyavad
DeleteKhupach mast👌👌
ReplyDeleteThank you so much Ankita for reading n dropping comment for me. Keep following and keep reading
ReplyDeleteVery nice
ReplyDelete